मिरची ची योग निवड
मिरची चे पावसाळी नियोजन 2019,
मिरची ची लागवड करताना मिरची विषयी संपूर्ण माहिती असने सर्वात महत्वाचे ठरते. मिरची कोणती लावली, योग्य जातीचा प्रकार माहिती आसावा, उन्हाळ्यात मिरची ची लागवड केल्यास पाणी जास्त प्रमाणात द्यावे लागते. पाण्याची कमतरता असल्याने मिरची ची लागवड पावसाळ्यात करावी.
मिरची ला पावसाळ्यात पाण्याचे नियोजन व्यवस्थित करता येते. पावसाळी मिरची चे नियोजन कसे करावे व मिरची ची जातं निवडतांना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या, हे खालील माहिती प्रमाणे
मिरची चे पावसाळी नियोजन 2019 , कृषि क्षेत्रात मिरचीच्या जास्तीत जास्त जाती लागवडी साठी उपलब्ध आहे. प्रत्येक जातीचे वेगवेगळे गुणधर्म आहे. परंतु मिरची ची करण्यासाठी योग्य ती जातं निवडणे योग्य ठरते. कारण जमिनीच्या फरकानुसार व वातावरणा नुसार वेगवेगळे वाण यात प्रकार पडतात. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या जातीची लागवड केली जाते. शेतकरी आपल्या जमिनीचा प्रकारा ओळखून व माती परिक्षण करून योग्य मिरची ची जातं लागवडीस निवडतात.
मिरची ची जाती
1> तेजस्विनी मिरची = हि एक तिखट मिरची ची जातं आहे. हि जातं कोणत्याही शेत जमिनीत येते. बाजारात या मिरची ला योग्य भाव मिळतो.
एकरी उत्पन्न- 8 ते 10 क्विंटल प्रती एकर
मर रोग व थ्रिप्स कमी प्रमाणात येते.
जमिनी नुसार खतांचा वापर करावा.
2> तेजाफोर मिरची = हि जातं काळ्या जमिनीत चांगल्या प्रकारे येते.
तोडा करण्यास उपयुक्त ठरते. बाजारभाव चांगला मिळतो.
एकेरी उत्पन्न 10 ते 12 क्विंटल प्रती एकर
थ्रिप्स व हिरवा तुडतुडा रोखण्यास प्रतिकार करते.
3> राशी मिरची = हि जातं काळ्या व मध्यम स्वरुपाच्या जमिनीत येते. उपयुक्त व मध्यम तिखट, तोडा करण्यास अतिशय सोपी.
एकेरी उत्पन्न 8 ते 10 क्विंटल प्रती एकर
खतांचा वापर करताना सिंचन द्वारे द्यावे. ह्युमिक ऑसिड, 19:19:19 असे खते वापरावी.
4>अग्निरेखा मिरची = हिरवी मिरची तोडण्यास उपयुक्त ठरते.
एकेरी उत्पन्न 8ते 10 क्विंटल प्रती एकर
भुरी आणि मर रोग यांवर प्रतिकार करते.
5>फुले ज्योती मिरची = मसाला पावडर बनवण्यासाठी हि मिरची जास्त वापरली जाते.
वाळेल मिरची चे एकेरी उत्पन्न 10ते 12 क्विंटल प्रती एकर
भुरी रोग कमी प्रमाणात पडतो, फुलं किडे व पांढरी माशीला प्रतिकार करते.
6>ब्याडगी मिरची = लाल मिरची साठी हि जातं वापरली जाते. दीर्घ काळ साठवून ठेवता येते, रंग फिकट होतं नाही. मिरची वर सुरकुट्या जास्त असतात. मिरची ची साल जाड राहते. त्यामुळे वजन जास्त राहते.
7>ज्वाला मिरची = लागवडी साठी योग्यजातं आहे.
तिखटपणा जास्त आहे.
8> पंत सी-1मिरची = हिरव्या व लाल मिरची साठी हि जातं वापरली जाते. तिखटपणा जास्त आहे.
9>फुले सई मिरची = या मिरची ला वाळलेल्या नंतर रंग गर्द लाल होतो. तिखटपणा मध्यम आहे.
10>संकेश्वरी-32 मिरची = या मिरची ची लागवड मुख्यतः लाल मिरची च्या उत्पादनासाठी केले जाते. तिचा रंग लाल व आकर्षक असतो. तिखट मध्यम आहे.
हि जातं प्रामुख्याने कोरडवाहू जमिनीत लावली जाते.
मिरची ची योग्य निवड
Reviewed by Agrotechnic
on
August 10, 2019
Rating:
Reviewed by Agrotechnic
on
August 10, 2019
Rating:

No comments:
Thank you for comment